जत,प्रतिनिधी : जत शहरातील दिव्यांग बांधवांचा दिव्यांग कल्याण निधी जत नगरपरिषदेकडून 2012 पासूनचा देणे प्रलंबित होता तो व्याजासह दिव्यांग बांधवांना द्यावा अन्यथा दिव्यांगाना सोबत घेऊन 8 जून रोजी जत नगरपरिषदेच्या स्थापने दिवशी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा विक्रम ढोणे यांनी दिला होता.
त्याची दखल घेऊन जत नगरपरिषदेने पुढील सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन दिव्यांग बांधवांचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले असल्याने दिव्यांग बांधवांचे लक्षवेधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे,अशी माहिती विक्रम ढोणे यांनी दिली.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेनंतर जर दिव्यांग बांधवांचा दिव्यांग कल्याण निधी व्याजासह देण्यात आला नाही,तर पुन्हा दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल,असे विक्रम ढोणे म्हणाले.