डफळापूर, वार्ताहर : डफळापूर-अंनतपूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दर्जाहीन होत आहे.बुधवारी चक्क रिमझिम पाऊस सुरू असतानाही हे काम सुरू होते,चिखल,त्यातच डांबर ओतून ओली झालेली खडी टाकण्याचा हा प्रकार ग्रामपंचायत सदस्य देवदास पाटील व बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांनी बंद पाडले.
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यांची कल्पना देण्यात आली आहे.आज त्यांच्याकडून पाहणी होणार असल्याचे पाटील,चव्हाण यांनी सांगितले.
डफळापूर गावातून जाणारा हा आतरराज्यीय महत्वाचा रस्ता आहे.गेल्या वर्षभरात हे दुसऱ्यावेळी काम केले जात आहे.प्रत्येकवेळी दर्जाहीन कामामुळे काही महिन्यात हा रस्ता जैसेथे होत आहे.त्यामुळे सातत्याने पडणारे रस्त्यावरील खड्डे पाठ सोडत नाहीत.प्रत्येक वेळी झालेली काम ठेकेदाराकडून कशी केली गेली आहेत यांचे संशोधन करण्याची गरज आहे.कोट्यावधी रुपयाचा निधी या रस्त्यावर खर्च करण्यात आला आहे.मात्र खड्डेमय रस्ता ही कायमची स्थिती आहे.आताही या रस्त्याचे काम सुरू आहे. खरेतर खड्डीकरण करताना या रस्त्याचा पुर्वीचा भाग काढण्याची गरज होती,मात्र तो न काढता थेट वर्ती खडी टाकून त्यावर डांबरीकरणचा स्तर टाकण्यात येत आहे. या कामात डांबर अत्यल्प वापरले जात आहे.बुधवारी तर ठोकेदारांनी कहरच केला.रिमझिम पाऊस सुरू असतानाही काम करण्यात येत होते.पाऊसाचे पाणी रस्त्यावरील अनेक खड्ड्यात थांबलेले,त्यातच ओली खडी असतानाही त्यातच डांबर टाकून खडीकरण करण्यात येत असल्याचे ग्रा.प.सदस्य देवदास पाटील व बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी हे काम बंद पाडले आहे.या कामाची माहिती असणारा फलकही लावण्यात आलेला नाही.
पाऊसाने पाऊसाने चिखल झालेला असतानाही डफळापूर-अंनतपूर रस्त्याचे डांबरीकरणाचे सुरू होते.