जत,प्रतिनिधी : जत येथे भविष्यातील उपाययोजना म्हणून समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील संस्था क्वारंनटाईन सेंटरचे कोविड सेंटरमध्ये रुंपातर करण्यात आले आहे. त्यामुळे जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णावर आता जतमध्येच उपचार केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर,वरिष्ठ सुपरवायझर श्री.उगारे,श्री.माळी यांनी जतेतील कोवीड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली.
सध्या जिल्ह्यात मिरज येथे कोरोना बाधित रुग्णावर उपचार केले जातात.जतपासून मिरज सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे.त्याशिवाय भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास मिरज येथे रुग्णांची संख्या वाढू शकते.त्यामुळे भविष्यातील उपाययोजना म्हणून जत येथेच कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यात येणार आहे.या कोविड सेंटरची आरोग्य विभागाकडून सुरूवात करण्यात आली आहेत.दरम्यान जत येथे हे कोविड सेंटर सुरू झाल्याने कोरोनाच्या रुग्णावर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. त्याशिवाय जत येथेच उपचार होण्याचे या भागातील रुग्णांना सोयीचे होणार आहे.सध्या जत व गुड्डापूर येथे संस्था क्वारंनटाईन सेंटर सुरू आहे. जत येथील कोविड केअर सेंटरला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी भेट देत पाहणी केली.
|
|