जत,प्रतिनिधी : देशभरात कोरोनामुळे बंद असलेल्या पानटपऱ्या चोथ्या टप्यात लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा चालु झाल्या आहेत.या पानपट्ट्यातील बेकायदा गुटखा,मावा व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन गावागावात शौकीनाच्या पिचकाऱ्या वाढल्याने धोका निर्माण झाला आहे.
तंबाखूजन्य पदार्थामुळे कोरोनाचा फैलाव वाढू शकतो यामुळे पानटपऱ्यांना लवकर परवानगी देण्यात आल्या नव्हत्या.
मात्र चौथ्या टप्यात सुरू झालेल्या या पानपट्ट्यातून बंदी असलेला गुटखा चारपट,तर मावा दुप्पट दराने विक्री होत असल्याने शौकिन चौकाचौकात पिचकाऱ्या मारत आहेत.तर दुसरीकडे अनेक पानपट्टी चालकांकडून सोशल डिस्टन्सिंग उल्लंघन होत आहे.याकडे अन्न औषध प्रशासन व पोलीसांनी लक्ष घालावे,अशी मागणी होत आहे.