धक्कादायक | आंवढीत आणखीन दोन कोरोना पॉझिटिव्ह | एकूण संख्या तीनवर | वरिष्ठ अधिकारी आंवढीत दाखल
जत,प्रतिनिधी : आंवढी ता.जत
येथील आणखीन दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील भाऊ व मानखुर्द येथून आलेल्या एकजणाचा यात समावेश आहे.आंवढीतील कोरोना रुग्णाची संख्या तीन झाली,असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर यांनी दिली.
आंवढीतील हे दोघे सख्ये भाऊ विना परवाना मोटारसायकलीवरून आंवढीत आले होते.प्रांरभी ते होम क्वॉरंटाईनमध्ये होते. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने खबरदारी घेतल्याने त्यांना जत येथील वसतीगृहात संस्था क्वारंनटाईन केले होते.

शुक्रवारी रात्री उशिराने त्यांचे रिपोर्ट आले.दोघेही कोरोना बाधित झाले आहेत.अन्य एकजणाचे कुंटुब मानखुर्द येथून खाजगी गाडीने आंवढीत आले होते.त्यातील 60 वर्षाचा पुरूषाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान हे तिघेही गावातील लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आंवढी लोहगावसह शेगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील, पो.नि.रामदास शेळके,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बंडगर हे आंवढीत दाखल झाले आहेत.