महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0
1





मुंबई :- महारष्ट्रात कोविड 19 या कोरोना महामारीला अस्थिर करण्या ऐवजी स्थिर करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार ने केले आहे. त्यामुळे हे सरकार अस्थिर झाले आहे. राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात न घेणाऱ्या आणि कोरोनाला रोखण्यात स्पष्ट अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकार ला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली आहे.

कोणतेही नैसर्गिक मोठे संकट राज्यवार आले असताना सर्व राज्याने एकजूटीने संकटाचा मुकाबला करायचा असतो. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची  एकत्र बैठक घेऊन त्यांना विशेषतः विरोधी पक्षाला ही विश्वासात घ्यायचे असते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना च्या संकटाशी मुकाबला करण्यास राज्यातील विरोधी पक्षाला विश्वासात घेतले  नाही. कोरोना च्या संकट काळात राजकारण करण्याची गरज नाही मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रियस्तरावर लॉकडाऊन वर टीका करीत आहेत. लॉकडाऊनमूळे देशात लाखोंचे प्राण वाचले  आहेत. कोरोनाची साथ रोखण्यात लोकडाऊन उपयोगी ठरत आहे. त्यामुळे लॉकडाऊनवर टीका करण्याचे  राहुल गांधींचे राजकारण निषेधार्ह आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.

देशात सर्व राज्यांनी कोरोना रोखण्यात यश मिळविले आहे. मात्र महाराष्ट्र्र सरकारला यश मिळाले नाही. कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारण खेळत राहिले. राज्यात कोरोनाला  रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकार ला राज्यात सत्तेत राहण्याचा अधिकार नाही असे ना रामदास आठवले म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here