महाराष्ट्रात सत्ताधा-यांची “अशी ही बनवाबनवी” सुरू -भाजपा नेते आमदार अँँड आशिष शेलार

0


Rate Card

मुंबई : एकिकडे रूग्णांची संख्या वाढते आहे. रूग्णांना दाखल करून घेत नाहीत, रूग्णवाहिका नाहीत मुंबईत हाँँस्पिटल उभे केले तर डाँँक्टर नाहीत, नर्स नाहीत, असे एकिकडे चित्र तर दुसरीकडे रूग्णांची खरी आकडेवारीच समोर येवू देत नाहीत.तिसरीकडे केंद्र सरकारकडून मदत आलीच नाही असे सांगीतले जाते आहे. महाराष्ट्रात सरकारची “अशी ही बनवाबनवी” सुरू आहे, असे सांगत भाजपा नेते आमदार अँँड आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

महाराष्ट्रात दुर्दैवाने रूग्णांची संख्या रोज वाढते आहे. विशेषतः मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेली असताना राज्य सरकार मात्र रोज आपलीच पाठ थोपटून घेते आहे. कधी वरळी पँटर्न, कधी मुंबई पँटर्न असे नवे नवे स्वतःच्या कौतुकाचे पँटर्न तयार केले जात आहेत. केंद्रीय प्रधिकरणांंचे, पथकांचे खोटे हवाले देऊन महाराष्ट्र सरकार आपले कौतुक करीत आहे. मुंबईत कोरोना रोखन्याच्या कामाचे निती आयोगाने कौतुक केले असे खोटे वृत्तही महाराष्ट्रात पसरवण्यात आले. त्यावर निती आयोगाने तातडीने खुलासा करून अशा प्रकारे कोणतेही कौतुक करण्यात आले नसल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात सध्या अशाच प्रकारची “बनवाबनवी” सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.