जत,प्रतिनिधी : कोरोना विषाणूचे संकटात मोठ्या हिमत्तीने काम करत असलेल्या आशा सेविकांच्यामुळे आपण कोरोनाचे संकट मर्यादित ठेऊ शकलो आहे,या लढ्यात वैद्यकीय क्षेत्र, पोलिसांसह आशाचे योगदान मोठे आहे,असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.
जत तालुक्यात प्रभावीपणे काम करणाऱ्या या आशा वर्कर्सना अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तर्फे,कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,व कृषि राज्य मंत्री ना.डॉ.विश्वजित कदम यांच्याकडून जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर्स यांना जीवनावश्यक किट वाटप करण्यात आले,यावेळी आ.सांवत बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे,तहसीलदार सचिन पाटील,उपविभागीय कृषि अधिकारी कांताप्पा खोत,जत तालुका कृषि अधिकारी मेढेदार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर,सौ.मिनल सावंत/पाटील,सौ.नलिनी शिंदे,जत तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार,माजी सभापती बाबासाहे कोडग,जत तालुका कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे,माजी नगरसेवक निलेश बामणे,माजी नगरसेवक मुन्ना पखाली,व पदाधिकारी उपस्थित होते
आ.सांवत म्हणाले, स्वतःची पर्वा न या आशा कोरोना योध्दासारख्या मैदानात आहेत. अनेक घरांमध्ये जावून माहिती मिळवणे, यामुळे त्यांच्या आरोग्याशी त्या धोका पत्करून काम करत आहेत. लोकांचे प्रबोधन करणे,बाहेरून आलेल्या व्यक्तीची पाहणी करणे, आवश्यक तेथे आरोग्य कामी मदत करणे, हे काम सुरु आहे. या स्थितीत त्यांची आव्हाने मोठी आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेऊन. त्यांना या जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप करण्यात येत आहे.
जत तालुक्यातील आशा वर्कर्सना जीवनावश्यक किटचे वाटप करताना आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील आदी