पुर्व भागातील पाण्यासाठी संघर्ष करावा ; संजय तेली | राजकारणापेक्षा पाणी महत्वाचे

0

जत,प्रतिनिधी : दुष्काळ पाचवीला पुजलेल्या जत तालुक्यात जत पश्चिम भाग पाण्याखाली येत असताना पुर्व भागातील पाण्याचे राजकारण संपण्याचे नाव घेत नसल्याचे वास्तव आहे.प्रत्यक्षात पाण्यापेक्षा राजकीय दुकानदारी चालविण्याचे उद्योग सुरू आहेत.दुसरीकडे अशा प्रकाराने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.दुष्काळ व पाणी याच मुद्यावरून राजकारण सुरू आहे. जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आणल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार श्रेयवाद रंगला आहे.

Rate Card

पंरतू पूर्व भागातील सुमारे 57 गावातील लोकांची पाण्यासाठी आजही भटकंती सुरू आहे.टँकरने पाणीपुरवठा केला जातोय, त्यासाठी कोट्यवधी रुपये दरवर्षी शासन खर्च करते.एवढा खर्च करूनही तालुक्यातील दुष्काळ तसाच आहे.सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी जत तालुक्यातील पुर्व भागात आले आहे,ते येणारच होते.आलेल्या पाण्याचे पूजन करून पाणी आणल्याचा गाजावाजा करून दुष्काळ संपणार नाही.तर दुसरीकडे जतच्या पूर्व भागातील माडग्याळ, संख, उमदी या तीव्र दुष्काळी भागातील 42 गावांचा आजही म्हैसाळ योजनेत समावेश नाही.त्या गावातील लोकांना दरवर्षी उन्हाळ्यात पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. या दुष्काळी भागाचा विचार फक्त निवडणूका येताच केला जात आहे.आताही तो प्रकार होत आहे.राजकारण करण्यापेक्षा पुर्व भागातील वंचित गावांच्या समावेशासाठी लढा उभा करून संपूर्ण तालुक्यात पाणी फिरविण्यासाठी प्रयत्न केल्यास तालुक्याच्या हिताचे किंबहुना दुष्काळ हटविण्याचे पुण्य लाभेल,त्यामुळे राज्यातील सत्तेचा वापर करून या गावांचा पाणी प्रश्न सोडवावा,त्यासाठी संघर्ष करावा लागेल तर आम्हीही त्यात सहभागी होऊन लढा उभारू असे आवाहन, उमदी जिल्हा परिषद गटाचे नेते संजय तेली यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.