जत,प्रतिनिधी : जत शहरातील एका मृत्त तरूणाचा कोरोना बाधितच्या अफवेने नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या अत्यसंस्कारासाठी मृत्ताचा मृत्तदेह कचरा गाडीतून नेहण्याचा गंभीर प्रकार जतच्या मुख्याधिकाऱ्यासह प्रशासनाने केला आहे. यात मानवी हक्काची पायमल्ली झाली असून त्यांची चौकशी करावी अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे. तशा मागणीचे निवेदन राज्य मानवी हक्क आयोगाकडे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,जत शहरातील एक 32 वर्षीय तरूण रायगड जिल्ह्यातून जतमध्ये आला होता.बाहेरून आल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने होम क्वॉरंटाईनचा शिक्का त्यांच्या हातावर मारला होता.तो तरूण अनेक दिवसापासून आजारी होता.दरम्यान ता.24 मे रोजी त्यांचा जतच्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.यात या तरूणाचा मुत्यू कोरोनामुळे झाला अशी अफवा पसरल्याने नातेवाईकांनी मृत्तदेहावर नगरपरिषदेने अत्यसंस्कार करावेत अशी मागणी केली.त्यानुसार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे व कर्मचाऱ्यांनी त्या इसमाच्या मृत्तदेहावर अत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
त्या मृत्ताचा मृत्तदेह खाजगी दवाखाना ते स्मशानभूमी असा एक किलोमीटर पर्यत चक्क कचरा उचलणाऱ्या गाडीतून नेहत मृत्तदेहाची अवहेलना करण्यात आली आहे. यात मानवी हक्काची पायमल्ली तर झालीच आहे.त्याशिवाय माणूसकीला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे.यांची उच्चस्तरीय चौकशी करून संबधितावर कारवाई करावी असे निवेदनात ढोणे यांनी म्हटले आहे.निवेदनाच्या प्रति सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही मेलद्वारे पाठविले आहे.