सांगलीत आज नवे 3 जण कोरोना बाधित रुग्ण | अंकलेच्या एकजणासह सहाजण कोरोनामुक्त
सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 3 जण नवे रुग्ण वाढले आहेत. तर 6 जण कोरोना मुक्त झाले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात आता उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या 44 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
मुंबईहून आलेल्या खानापूर तालुक्यातील गोरेवाडी,कडेगाव तालुक्यातील नेर्ली आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिहगाव मधील तिघे जण कोरोना बाधित झाले आहेत.तर 6 कोरोना बाधीत झाले कोरोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

यात मिरजेच्या कर्नाळ- 1, जतच्या अंकले-1, शिराळाच्या रेड-2 वाळव्याच्या कुंडलवाडी -1 आणि आटपाडीच्या मरगळे वस्ती येथील 1असे उपचार घेणारे कोरोना बाधीत रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या 44 वर पोहचली आहे.जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद संख्या 101 वर पोहचली आहे.
