आघाडीची तीन माणसं रडली की बोलली?आता रडून नाही, करुन दाखवा : भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

0


मुंबई; आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा, रडू नका, अशा शब्दांत भाजपा नेते माजी मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला.
आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे प्रमाण म्हणजे भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको.
महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे,आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या”तीन माणसांच्या” दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि “तीन माणसं” एकमेकाकडे बघत बसले!आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार ही आमदार अँड. आशिष शेलार यांनी मानले.
तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील  हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय? दुर्गंधी का सोडताय?  “त्यांना” जमत नसेल “तुम्ही” करुन दाखवा!
महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात…तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय..महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली.. सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय?आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय? अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.

“आघाडीची तीन माणसं” बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला!आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख खा. राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली..पळकुटी भूमिका आज पण दिसली.काँग्रेस पळुन दाखवतेय… किमान
बाकीच्यांनी रडून नको, करून दाखवा.
गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना  उपचार देत आहात. अँड अनिल परब हा आभास नाही सत्य आहे.
आभासी रडू नका, या सत्यावर बोला!
मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या!.अशा कडक शब्दात त्यांनी पलटवार केला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.