प्रतिकात्मक छायाचित्र
जत,प्रतिनिधी : कर्नाटकातून विना परवाना चेक पोस्ट चुकवूव लोक आणल्याबद्दल नंदबसाप्पा गुरुपाद हडपद (वय 39 वर्षे,रा- सरबाड,ता-जि- विजापुर) यांच्या विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी पोलीस कर्मचारी प्रविण पाटील यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,मुंचडी चेकपोस्टवर ड्युटीवर असलेले प्रविण पाटील व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना नंदबसाप्पा हडपद हा मुचंडी ता- जत येथे चारचाकी सुमो गाडी (केए 28,डी 2038)यामधुन बेकायदेशीरपणे कर्नाटक राज्यातील पाच- सहा लोकांना व तो स्वत:चा महाराष्ट्रात येण्याचा कोणताही परवाना नसल्याने महाराष्ट्र राज्यात येत असताना मुचंडी चेकपोस्ट येथे त्यांना थांबवुन तेथील पोलीसांनी परत विजापूर रोडने कर्नाटक राज्यात जाण्यास सांगितले होते.मात्र तो परत सदर लोकांना टेम्पोमधुन दुस-या मार्गाने महाराष्ट्र हददीत घेवुन जात असताना मुचंडी गावात मिळून आलेला आहे.सदर टेम्पोचालकाने जत हद्दीत प्रवेश करुन हयगयीने व बेदरकारपणे मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून प्रवेश केला आहे.
त्यामुळे त्यांच्याविरोधात कोरोना विषाणु संसर्ग पसरवण्याची घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणे,तसेच संचारबंदी कालावधीत तसेच भारतभर लॉकडाऊन सुरू असताना विनापरवाना टेम्पोने प्रवास करून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी गुन्ह्याखाली भा. द. वि. सं. कलम.188,269,270,290 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), महा. कोवीड
-9 उपाययोजना 2020 चे कमल 11 तसेच मोटारवाहन कायदा 1988 चे कलम – 66(1)/192 आदी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विनायक शिंदे करत आहेत.