जतेत इसमाचा मुत्यू ; प्रशासनाकडून दक्षता
जत,प्रतिनिधी : रविवारी जत शहरात झालेल्या एका इसमाच्या मुत्यूनंतर नागरिकांनी शंका उपस्थित केली होती.त्यांचा वैद्यकीय अहवालात अन्य आजाराने मुत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तरीही लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सर्व प्रकारे खबरदारी घेतली आहे.दरम्यान संबधित इसमावर रात्री उशिराने नगरपरिषदेच्या वतीने अत्यसंस्कार केले होते.
मयत इसम राहत असलेल्या परिसर व उपचार करण्यात आलेल्या दवाखान्यात प्रतिबंधित औषध फवारणी केली आहे.

त्याशिवाय मयत इसमाचे आई-वडीलही आरोग्य विभागाच्या निगरानी खाली आहेत.त्यांचे खबरदारी म्हणून स्वाब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
दरम्यान संबधित इसमाचा मुत्यू नंतर सोशल मिडियाद्वारे उलटसुलट चर्चा करून भितीचे वातावरण पसरविल्या बद्दल प्रशासनाच्या वतीने कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.प्रांताधिकारी, तहसीलदार,पोलिस निरिक्षक,मुख्याधिकारी यांनी दिले.
