जत | बांधावर खते,बि-बियाणे योजनेस सुरूवात

0
5

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन व ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्याच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे पुरवठा योजनेची सुरूवात पाच्छापूर येथून झाली.आमदार विक्रमसिंह सांवत,उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.कांताप्पा खोत,तालुका कृषी अधिकारी श्री. मेडीदार यांच्याहस्ते डिएपी खताचे शेतकऱ्यांना बांधावर जात वाटप करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ही योजना जाहीर केली 

असून,शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे,खतेबांधावर उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. स्थानिक शेतकरी गटामार्फत हीयोजना राबविण्यात येत आहे. यावेळी सरपंच,माजी पंचायत समिती सदस्य नितीन शिंदे,ऐश्वर्या कृषी सेवा केंद्राचे संचालक अर्जून सवदे उपस्थित होते.

जत पाच्छापूर येथे शेतकऱ्याच्या बांधावर रासायनिक खते व बियाणे पुरवठा योजनेची सुरूवात करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here