स्व.नानासो कोरे यांच्या कुंटुबियांचे आ.कपिल पाटील यांच्याकडून सात्वन

जत,प्रतिनिधी : स्वर्गीय कै.नानासो कोरे कुटुंबीयांची आमदार कपिल पाटील यांचेकडून संवेदनशील भावनेने चौकशी करण्यात आली.कोरे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांना कोरे यांच्या वडीलांना धीर दिला.सांगली (जत) डफळापुर येथील हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार कपिल पाटील यांनी कोरे कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला व सहानुभूतीपूर्वक चौकशी केली स्वर्गीय कै.नानासाहेब कोरे यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्यासंदर्भात जिल्हा परिषद व शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
जत तालुका शिक्षक भारती टीम यांनी कोरे कुटुंबातील सदस्यांना भेट दिली त्यावेळी आमदार पाटील यांनी कोरे कंटुबियाशी संवाद साधला.लॉकडाऊनमुळे त्यांना थेट भेट घेता येत नसल्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त करत आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत,असा धीर कुंटुबियांना दिला. यावेळी शिक्षक भारतीचे जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत नेते नवनाथ संकपाळ जिल्हा उपाध्यक्ष मल्लय्या नंदगाव, जितेंद्र बोराडे, अविनाश सुतार, हाजी पठाण यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.