जत पूर्वभागातील डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप |
सोन्याळ |गाव पातळीवर आरोग्य कर्मचाऱ्यासह सरपंच,ग्रामसेवक,आशासेविका,पोलिस अधिकारी, कर्मचारी,आदींनी आपआपल्या परीने आणि जबाबदारीने काम करीत आहेत.तरीसुद्धा आपल्या भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने सजग राहून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आरोग्यदूत म्हणून चांगले काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य प्रदेश सदस्य ऍड चन्नाप्पा होर्तीकर यांनी केले. कोरोनाच्या प्रादुर्भावात आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची काळजी घेण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही अशा जत तालुक्यासह पूर्वभागातील डॉक्टरांच्या सेवेची दखल घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माडग्याळ आणि उमदी येथे आयोजित पीपीई किटचे वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमदी,संख जाडरबोबलाद जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व खाजगी डॉक्टर्स उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका उपाध्यक्ष फिरोज मुल्ला, माजी उपसभापती रेवप्पा लोणी, सिद्दनगौडा पाटील, सुभाष पाटील,शिवलिंग पाटील, रवी शिवपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.डॉ प्रदीप शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक तर डॉ चंद्रशेखर हिट्टी यांनी आभार मानले.यावेळी परिसरातील डॉक्टर्स उपस्थित होते.
