आटपाडीतील एकजणासह जिल्ह्यात दोघेजण कोरोणाबाधित,एकूण संख्या 20

0

सांगली : सांगली जिल्ह्यात आटपाडी व कुंडलवाडी येथे प्रत्येकी एक असे दोघेजण कोरोणाबाधित आढळल्याने जिल्ह्याची संख्या 20 वर गेली आहे.

दिल्लीवरून दि.13 मे रोजी आलेल्या आटपाडी येथील 29 वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दिल्लीवरून आल्याने त्यांना आटपाडी येथे कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते.त्याला त्रास होऊ लागल्याने रविवारी त्याला मिरज सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते.त्याचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.या इसमाची पत्नी व मुलगीही आयसोलेशन कक्षात असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Rate Card

तर कुंडलवाडी येथील कोरोणाबाधित रुग्णाचा निकटवर्तीय नातेवाईक इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता.या व्यक्तीचेही इस्लामपूर येथे स्वाब घेण्यात आला होता.त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो चाचणी अहवालात पॉझिटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत हे दोघे वाढल्याने सांगली जिल्ह्यात उपचारा खालील कोरोणा बाधित रुग्णांची संख्या 20 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.