सांगली जिल्ह्यात एका दिवसात पाच जण कोरोणाबाधित,तिघे कोरोणामुक्त ; जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी
सांगली : कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये असणाऱ्यांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .
तर सांगलीतील लक्ष्मी नगर (साखर कारखान्या जवळ) येथील एकाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
साळशिंगी , ता खानापूर येथील आठ वर्षीय मुलाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

तर दुधेभावी येथील कोरोना बाधीत रुग्णाशी संबंधित दोघांची पंधरा दिवसानंतरची कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच घोरपडी येथील रुग्णाची पंधरा दिवसानंतरची कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 50 जणांची कोरोणा चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यापैकी 32 जण कोरोणामुक्त झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 17 कोरोणा बाधित सध्या उपचाराखाली आहेत.
अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.