डफळापूर | कोरोना ड्युटीवरील शिक्षकाच्या कुंटुबियांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांने केले सांत्वन | सविस्तर वाचा |

0

जत तालुक्यातील डफळापूरातील कोरोना ड्युटीवरील शिक्षकाला ट्रने उडविलेल्या ठार झालेल्या शिक्षकांच्या कुंटुबियांची तहसीलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर पो.नि.रामदास शेळकेसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट घेत धीर दिला.प्रशासनाकडून सर्व प्रकारे मदत करू असे आश्वासन जिले.

जत,प्रतिनिधी : डफळापूर ता.जत नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव 

ट्रक चालकाने अंगावर घातल्याने सदर शिक्षकाचा मृत्यू झाला.

नानासाहेब(पिंटू) सदाशिव कोरे वय- 36,रा.डफळापूर (शाळा कोळी वस्ती,डफळापूर)असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे.तर त्यांच्या सोबत असणारा जिरग्याळ ग्रामपंचायतीचा लिपिक संजय बसगौंडा चौगुले वय -30 हा बाजूला फेकला गेल्याने थोडक्यात बजावला.याप्रकरणी ट्रक चालक हणमंत रामचंद्र मोरडे,रा.नाथाचीवाडी,ता.दौंड,जि.पुणे याला पोलीसांनी ट्रकसह ताब्यात घेतले आहे.

डफळापूर स्टँडनजिक मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी

शिंगणापूर नजिकच्या आंतराष्ट्रीय चेक नाक्यावर पो.कॉ.प्रंशात खोत,शिंगणापूर पोलीस पाटील कांबळे,मिरवाड पोलीस पाटील बजरंग पाटील,कोळी वस्ती(डफळापूर) जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक नानासो कोरे,जिरग्याळ ग्रामपंचायतीचा लिपिक संजय चौगुले,वैद्यकीय अधिकारी अमर मुजावर

सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर कार्यरत होते.

सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चेक पोस्टवर अथणी तालुक्यातील अंनतपूर येथून ट्रक क्र.एमएच 12,एलटी 9749 हा येत असताना दिसल्याने त्यांनी सदर ट्रक थांबविण्याचा चालकास इशारा केला,मात्र ट्रक डफळापूरच्या दिशेने घेऊन गेल्याने ट्रकमध्ये विनापरवाना काही लोक व संशयास्पद माल असण्याची शंका आल्याने शिक्षक नानासो कोरे,संजय चौगुले,पोलीस पाटील कांबळे,बजरंग पाटील यांनी सदर ट्रकचा पाटलाग करत डफळापूर नजिक मध्यला रोडने डफळापूर स्टँडवर जात काही स्वंयसेवकांच्या माध्यमातून ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र तो ट्रक न थांबवताच भरधाव वेगाने डफळापूर कडे पळविला.दरम्यान एका गाडीत काही लोक आढळून आल्याने,या सीमेंट भरलेल्या ट्रकचा संशय आल्याने कोरे,डाटा ऑपरेट संजय चौगुले व अन्य एका दुचाकीवरून ट्रकचा पाटलाग करत डफळापूर स्टँडपर्यत आहे.तेथे गावातील अंतर्गत वाटेने ते स्टँडजवळ ट्रक अडविण्यासाठी काही स्वंयसेवकासह थांबले होते.येथेही ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला,मात्र ट्रक चालकास चेकपोस्टवरील लोक दिसताच ट्रक चालकांने भरधाव ट्रक पळवत रस्त्यालगत उभे असलेल्या एमएच 10,एझेड 8743 या दुचाकीसह नानासोला ट्रक चालकांने  चिरडले.तसेच सुमारे पन्नास फुट फरफडत नेहले.त्यात नानासाहेबाच्या डोक्याचा चेदामेंदा झाला.त्यामुळे तो जागीच ठार झाला. त्यांच्या सोबतचा संजय चौगुले हा बाजूला फेकला गेल्याने बालबाल बचावला.घटनेनंतरही ट्रक न थांबविताच भरधाव ट्रक पळवत 

पेट्रोल पंपावर ट्रक थांबवून पळ काढला.

सीमेंट भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे निघाला होता.घटनेनंतर ट्रक चालक हणमंत मोरडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोरे कुंटुबियावर नियतीचा घाला

कर्तव्यदक्ष शिक्षक नानासो कोरे यांचे कुंटुब उच्चक्षित आहे.वडील प्रगतिशील शेतकरी,आई गृहणी,काका भारतीय पोस्ट खात्यात अधिकारी,भाऊ व त्यांच्या पत्नी आस्ट्रेलिया येथील एका कंपनीत उच्चपदस्थ अंभियता आहेत.नानासो यांच्या पत्नी ह्याही खाजगी इंग्लिश शाळेत शिक्षक म्हणून काम करतात.त्यांना एक नऊ वर्षाचा मुलगा आहे.दोन वर्षापुर्वी त्यांच्या वडीलावर ह्रदय शस्ञक्रिया झाली आहे.चार महिन्यापुर्वी त्यांच्या काकांचा अपघात झाला होता.त्यांनतर त्यांचा ह्रदयद्रावक मुत्यूने कुंटुबियावर नियतीने घाला घातला आहे.

डफळापूरात स्टँडवर दुसरा भिषण अपघात

सन 2018 साली महत्वाची बाजार पेठ डफळापूर येथे असाच एका ट्रकचा अपघात झाला होता.सांगली कडून खडी भरून आलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभा राहिलेल्या मारूती गाडीला धडक देत सुमारे दोनशे मीटर फरफडत नेहत जतकडच्या वळणालगत असणाऱ्या दुकानात ट्रक घुसविला होता.त्यावेळी मारूती गाडीतील चारजणांचा जागेवर चिरडल्याने मुत्यू झाला होता.सोमवारी पहाटे झालेल्या अपघाताने त्या आठवणी ताज्या केल्या.या ट्रकला आडविण्यासाठी दोन दुचाकीवरून चौघेजण आले होते.एक दुचाकी 

रस्त्याच्या कडेला थांबविली होती.तर नानासो कोरे दुकारी रस्त्याच्या कडेला घेत असतानाच त्याला ट्रक चालकांने चिरडले.त्यात ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागेवर अंत झाला.तर त्यांच्या दुचाकीवरील एकजण बाजूला फेकल्याने वाचला,तर दोघे रस्त्याच्या बाजूला उभे राहिल्याने बचावले.दुर्देव्याने काटेकोर कर्तव्य बजावत असणाऱ्या कोरे यांचा ट्रक चालकांच्या बेजबाबदार पणामुळे मुत्यू झाला.वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ 

घटना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली होती.अर्ध्या तासात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.ते पुर्ण तपास,ट्रक आरोपीचा शोध,मृत्तदेहाचा पंचनामा,शवविच्छेदन,अत्यविधी होईपर्यत घटनास्थळी तळ ठोकून होते.अप्पर अधिक्षका मनीषा डुबुले,विभागीय पोलीस अधिकारी दिलिप जगदाळ,पोलिस निरिक्षक रामदास शेळके, कवटेमहाकांळाचे आप्पासाहेब कोळी,सा.पो.नि.महेश मोहिते असे वरिष्ठ अधिकारी सुमारे शंभरावर पोलीस कर्मचारी घटनास्थंळी लक्ष ठेवून होते.अत्यसंस्कार झाल्यावर अप्पर अधिक्षक डुबुले यांनी नानासो कोरे यांच्या घरी जात त्यांच्या वडीलाचे सात्वंन करत धीर दिला.पंचनामासह प्रशासकीय कागदपत्रे कठोरपणे बनविण्यात आली आहेत.संशयित आरोपी चालकाला कठोर शिक्षा होईल,असे शब्द दिला.दरम्यान संध्याकाळपर्यत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गतीरोधकांची गरज 

जत-सांगली महामार्गीवर असणाऱ्या डफळापूर या प्रमुख गावातून हा मार्ग जातो.मोठ्या प्रमाणात लगतच्या गावातील नागरिकांचा संपर्क असलेल्या या रस्त्यावर मोठी गर्दी असते.त्यातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची ये-जा असते.थेट वळण व जतकडे उतार असल्याने वाहने भरधाव वेगाने धावत असतात.त्यामुळे कायम धोका असतो.रस्त्यावर वाहनाचा वेगाची मर्यादा नियंत्रीत ठेवण्यासाठी एसटीपीअप शेडपासून काही फुटावर दोन्ही बाजूला गतीरोधक बनविण्याची गरज पुन्हा या अपघाताने समोर आली आहे.

शोकाकूल वातावरणात अत्यंसस्कार

दरम्यान दुपारी 1 च्या सुमारास नानासो कोरे यांच्या शेतात त्यांच्या मृत्तदेहावर शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,पोलीस निरिक्षक रामदास शेळके, माजी सभापती मन्सूर खतीब यांनी पुष्पहार अर्पण करत श्रंध्दाजली वाहिली.यावेळी सर्व स्तरातील काही मोजके नेते,अधिकारी,शिक्षक उपस्थित होते.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.