केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालयात शिकलेल्या हुशार नानासो कोरे यांना खरेतर राज्याच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हायचे होते.मात्र त्यादरम्यान त्यांनी शासनाच्या कोट्यातून डीएडचे शिक्षण पुर्ण केले व त्यानंतर प्रशासकीय परिक्षेचा अभ्यास सुरू केला होता. दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेची शिक्षक भर्ती निघाली.त्यात नानासो कोरे रायगड जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नाव आले.वडिलाच्या इच्छेखातर नानासो कोरे यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली होती.त्यानंतर त्यांचा विवाह झाला.जिल्हाबाहेरची मुदत संपल्याने ते गेल्या वर्षी सांगली जिल्हा परिषदेकडे त्यांची बदली झाली होती.त्यात त्यांना जत पंचायत समिती अतर्गंत कोळीवस्ती(डफळापूर) येथील सहशिक्षकांचा कार्यभार सोपविला होता.वर्षभरात आपल्या अभ्यासातून त्यांनी अनेक उपक्रम राबवित शाळेतील विद्यार्थीची गुणवत्ता वाढविली होती.आपण करत असलेल्या कर्तव्याला जागणारा शिक्षक म्हणून त्याची डफळापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात ओळख होती.गेल्या पंधवड्यात त्यांची त्यांच्या शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर येथील कर्नाटक-महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय चेकपोस्टवर नियंत्रण कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.घटना घडली त्या दिवशी ते रात्रीपाळीची सेवा बजावत होते.ट्रक चालक चुकवून महाराष्ट्र प्रवेश केला,त्यातून कोरोना बाधित काही लोक महाराष्ट्रात प्रवेश करू नयेत यासाठी कर्तव्य बजावत ते व त्यांच्या सहकार्यांने ट्रक चालकांचा पाटलाग करत त्याला पडकले होते.मात्र ट्रक चालकांने थेट कोरे यांच्या अंगावर ट्रक घातला त्यात अखेर कर्तव्य दक्ष कर्तव्य बजावत असलेल्या एका शिक्षकांचा ह्रदयद्रावक मुत्यू झाला.त्यांच्या आकस्मिक मुत्यूने शिक्षण क्षेत्रासह गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.