उमदी | वीज अंगावर पडल्याने एकजणाचा मुत्यू
उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील उमदी येथे असलेल्या तळ्ळी वस्तीवर बाबूलाल महीबूब शेख (वय 26) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवार (ता.13) रोजी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान घडली.उमदी परिसरात बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. बाबूलाल शेख हे काम आटोपून घरी जात असताना वीज अंगावर पडल्याने बाबूलाल शेख यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आले. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.
