मुंबई; मुंबई आणि परिसर रेड झोन मध्ये आहे. दररोज येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत रेल्वे लोकल सुरू केल्यास कोरोनाचा अधिक मोठया प्रमाणात भडका उडण्याचा धोका आहे. लोकल रेल्वे सुरू केल्यास त्यातील गर्दी रोखणे कठीण होईल.या गर्दी मुळे मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठया प्रमाणात होईल.त्यामुळे रेल्वे लोकल मुंबईत सध्या सुरू करू नये अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकल रेल्वे सुरू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे केली आहे. तरीही केंद्र सरकार तसेच रेल्वे मंत्रालयाने सध्या ही मागणी मंजूर करू नये. मुंबईत रेल्वे लोकल सध्या सुरू करणे धोकादायक असल्याने लोकल सुरू कारण्याची परवानगी रेल्वे मंत्रालयाने देऊ नये अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबईत रेल्वे लोकल सेवा सुरू करण्या ऐवजी व्यक्तिगत अंतर राखण्याचा नियम पाळत बेस्ट ची बस सेवा सुरू करावी अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली आहे.
रेड झोन जेथे आहे तिथे लॉक डाऊनचा कालावधी 30 मे पर्यंत वाढवावा अशी आपली सूचना असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
कंत्राटी सफाई कामगार; 108 ऍम्ब्युलन्स चालक यांना महापालिकेने त्यांच्या स्वसंरक्षणाचे किट ;हॅन्ड ग्लोज; मास्क ; सॅनिटायझर द्यावेत. कंत्राटी सफाई कामगार आणि ऍम्ब्युलन्स चालक यांना दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. कंत्राटी सफाई कामगार आणि 108 ऍम्ब्युलन्स चालकांना सुद्धा 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण द्यावे. या मागण्यांकडे राज्य सारकर ने लक्ष द्यावे. अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
रस्त्याने उन्हातान्हात पायी चालत गावी जाणाऱ्या मजुरांना आडवून त्यांना जवळच्या रेल्वे स्थानकावरून रेल्वे ने त्यांच्या गावी सोडावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी राज्य सरकारला केली आहे.
औरंगाबाद मध्ये रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबांना राज्य शासनाने 5 लाखांची केलेली मदत अल्प असून त्या मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी 25 लाखांची मदत शासनाने करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.