संख | लॉकडाऊनमध्ये सर्व मद्यविक्री रोखण्याची मागणी

0
3

संख,वार्ताहर : जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.अशावेळी लॉकडाऊनच्या कालावधित मद्यविक्रीस परवानगी देऊ नये,अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश शंकर नाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी

यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.लॉकडाऊनच्या काळात काही राज्यांत मद्यविक्री सुरु करण्यासंदर्भात

सरकार विचाराधिन आहे. काही ठिकाणी परवानगी दिलीही आहे.सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.यातून गर्दी होणार आहे, कोरोनाचा फैलाव होणार आहे. यातून शासनास महसूल मिळणार आहे, आर्थिकदृष्ट्या हे फायद्याचे आहे. परंतु मद्यविक्री चालू झाल्यास आजच्या परिस्थितीला सामान्यांच्या हाताला काम नाही. बरेच लोक हे मद्य प्राशन करून कायदा हातात घेतील.गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होईल.किरकोळ वादविवाद, भांडणात वाढ होईल. कुटुंबात ताण-तणाव वाढून अप्रिय घटना घडतील.एकंदरीत मद्यविक्री सुरु करणे अयोग्य आहे.त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर फेरविचार करावा व राज्याला विनाशाकडे जाण्यापासून वाचवावे,अशी मागणी निवेदनात केली आहे.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here