जत | बाहेरून आलेल्या नागरिकांना जतेतच क्वारंनटाईन करा ; सरदार पाटील यांची मागणी

0
Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बाहेरून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गावात न पाठवता जत येथेच क्वारंनटाईन करा,अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.

जत तालुक्यात बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. सध्या शासनाच्या आदेशानुसार गावाबाहेर असणाऱ्या नागरिकांना घरी पाठविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात नोकरी,मजूरीसह अन्य कामासाठी बाहेरगावी असणारे नागरिक गावात परतत आहेत.त्यांना 14 दिवस गावातील शाळात क्वारंनटाईन करण्याचे आरोग्य विभागाचे आदेश आहेत.ही जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत व स्थानिक आरोग्य यंत्रणावर आहे.मात्र स्थानिक राजकारण,बाहेरून आलेल्या नागरिकांचा हेकेखोर पणा,गावातील संरपच,पदाधिकारी, ग्रामसेवकांनी सुचना देऊनही ते नागरिक शाळेत न राहता थेट घरी जात आहे.त्याशिवाय ते सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे उदाहरणे आहे.अंकलेच्या पार्श्वभूमीवर अशा बाहेरून आलेल्या नागरिकांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे तालुक्यात प्रवेश करताच त्यांना ताब्यात घेऊन तालुका प्रशासनाने जत येथील संस्था क्वारंनटाईन ठिकाणी ठेवावे,अशीही मागणी सरदार पाटील यांनी केली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.