सांगली,प्रतिनिधी : राज्यात विधान परिषदेसाठी 21 मे रोजी नऊ जागेसाठी निवडणूक होत आहे यापैंकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना द्यावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
खराडे म्हणाले लोकसभा व विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली होती,ही युती करताना स्वाभी मानीला सत्तेत वाटा देण्याचे ठरले होते मंत्रिपद, विधान परिषद आणि महामंडळ देण्याचे मान्य केले होते मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर कोणतेही सत्तेचे पद स्वाभिमानीच्या वाट्याला आले नाही.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश जागा स्वाभिमानी मुळे निवडून आल्या आहेत त्यामुळे सत्तेत सहभागी करून घेणे गरजेचे आहे आता पर्यंत ना मंत्री पद,ना महामंडळ दिलेले आहे.त्यामुळे किमान विधान परिषदेची उमेदवारी तरी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना द्यावी शेट्टी हे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे नेते आहेत.शेतकऱ्याच्या प्रश्नाची त्यांना जाण आहे.त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिल्यास शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लागणार आहे.त्याच बरोबर स्वाभिमानी ला काही अंशी सत्तेत वाटा ही मिळणार आहे त्यामुळेच त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे भाजपाला देशात विरोध करण्याची हिम्मत शेट्टी यांनी दाखविली आहे.एनडीए मधून प्रथम स्वाभिमानी बाहेर पडली होती त्यावेळी स्वाभिमानीचा निर्णय आत्मगातकी आहे, असे लोक म्हणत होते.पण त्यानंतर देशभर विरोध वाढत गेला स्वाभिमानीचां निर्णय योग्य होता, हे स्पष्ट झाले या सर्व बाबीचा विचार करून त्यांना संधी द्यावी अशी मागणी खराडे यांनी केली आहे.