बसर्गी | जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना मास्क,सँनिटायझरचे वाटप |

गुगवाड,वार्ताहर : बसर्गी(ता.जत)येथील
ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात हे बँक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना योध्दा प्रमाणे देश सेवा बजावत आहेत.त्यांची सुरक्षा महत्वाची आहे.म्हणून हे मास्क व सँनीटायझचे वाटप करण्यात आले.
उपसरपंच किशोर बामणे यांनी मास्क दिले.
यावेळी बँकेचे शाखाधिकारी अब्बास मंगळवेढेकर,वसुली अधिकारी काशिद, कँशिअर नाटेकर, व कर्मचारी उपस्थित होते.
बसर्गी ता.जत येथील जिल्ला बँक कर्मचाऱ्यांना मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.