संख | कोरोना संकट काळात बँकाचे लघुशाखा चालक बनलेत आधार |

0

संख : कोरोना विषाणूची ग्रामीण भागात मोठी दहशत निर्माण झालेले आहे. नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन सुरू आहे.मात्र जत तालुक्यातील ग्रामीण भागातील बँकेचे लघुशाखा चालक या लाँकडाऊनच्या कालावधीत जिवाची पर्वा न करता अखंड सेवा पुरवत असल्याने बँकवरचा ताण कमी होऊन ग्राहकाचे झटपट काम होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

   कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावागावातून जनजागृती झालेली पाहायला मिळत आहे.प्रत्येकजण गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळत आहेत. तर अत्यावश्यक सेवा समजल्या गेलेल्या बँकेच्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंग पाळली जात आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील बँकमित्र आपल्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे लाँकडाऊनच्या काळातही ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यामध्ये बँक आँफ महाराष्ट्र, बँक आँफ इंडिया या बँकेच्या लघुशाखा आहेत.बँक आँफ महाराष्ट्रचे 16 लघुशाखा आहेत.त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या याच सेवेमुळे ग्रामीण भागातील लोकांना चलनाचा तुटवडा जाणवत नाही.

      ग्रामीण भागातील लोकांचे येथील बँक ऑफ महाराष्ट्रशी आता जिव्हाळ्याचे नाते आहे. संख (ता जत) येथील बँक ऑफ महाराष्ट्र अंर्तगत तीन लघुशाखा आहेत. त्यामध्ये भिवर्गी येथे अमसिध्द बिरादार, संख येथे बिळ्याणसिध्द बिरादार, आसंगी(जत) येथे विनायक बाबर,अंकलगी येथे कुलंकर तेली हे लघुशाखा चालक आहेत.नियुक्त बँक लघुशाखा मित्राकडून लाँकडाऊन मध्ये मिळत असलेल्या बँक सेवेबद्दल ग्राहकातून समाधान व्यक्त होत आहे. 

     गेल्या महिनाभरापासून बँकेच्या आदेशाचे पालन करीत गावा गावात आपली बँकींग सेवा देत आहेत. यासाठी बँकेने तसेच बारटाँनिक्स इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत त्यांना सँनिटायझर, हातमोजे,मास्क उपलब्ध करुन दिले आहे.बँकमित्र येणाऱ्या ग्राहकाला सोशल डिस्टनसिंग पाळायला लावून त्यांच्या हातावर सँनिटायझर लावत आर्थिक व्यवहार पार पाडत  आहेत. जनधन खात्यावर सरकारने जमा केलेली पैसे लोकांनी बँक मित्राकडून खात्यातून काढली आहेत. त्यामुळे बँकेत होणारी गर्दी रोखण्यास मदत झाली आहे.

      कोरोना विषाणू संसर्गाचा.पाश्वभूमीवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. व्हिडीओकॉन्फरन्सच्या माध्यमातून ग्राहकांना बँकींग सुविधा करुन देताना घ्यायची काळजी व इतर सुरक्षात्मक उपाययोजना याबाबतीत माहिती देण्यात आली आहे.अशी माहिती बँक  मँनेजर राकेश रजन समन्वयक शरद यादव यांनी दिली आहे.

Rate Card

“संचारबंदी असताना ही सोशल डिस्टनसिंग पाळून ग्राहकांना सेवा दिली जात आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सँनिटायझरचा वापर केला जात आहे.गर्दी कमी करुन बँकवरचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.”

बिळ्याणसिध्द बिरादार,संख लघुशाखा चालक.

संख (ता जत) येथील महाराष्ट्र बँकेच्या लघुशाखेत ग्राहकांना सेवा दिली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.