दुधेभावी | कोराना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 कि.मी. त्रिज्येमध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित

0

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे-दुधेभावी या ग्रामपंचायत हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत. या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील व्यक्ती, जनतेच्या हालचालींवर व प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाणे व बाहेरून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सदरचा भाग प्रतिबंधित करण्याच्या अनुषंगाने भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे-दुधेभावी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणापासून 1 कि.मी. त्रिज्येमध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.

Rate Card

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे – (1) दुधेभावी – निमजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग, (2) निमज रस्ता – दुधेभावी पाझर तलाव च्या पूर्वेकडील बाजूचा भाग, (3) दक्षिण बाजूस पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा ओढा, (4) नामदेव फोंडे शंकर फोंडे व जाधव वस्ती च्या पश्चिमेकडील भाग. या क्रमंाक 1 ते 4 च्या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र. या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.