बिळूर | इंग्लिश गुरूकुल अँण्ड ज्यू.कॉलेजकडून ऑनलाइन अध्ययनाची तयारी |
गुगवाड,वार्ताहर : लॉकडाऊनच्या काळात बिळूर इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.विशेषता ज्या विद्यार्थ्यांनी बारावीत प्रवेश घेतला आहे याकरिता संस्थेच्या संचालकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सने सर्व शिक्षकांशी संवाद साधला.ऑनलाइन शिक्षण देण्याची चर्चा करण्यात आली. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता ऑनलाईन देण्याचे ठरविण्यात आले आहे.काही तांत्रिक त्रुटी दूर करून आर्ट्स कॉमर्स व सायन्स या सर्व विभागाकरिता शिक्षण देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. स्मार्ट फोनचा उपयोग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होत आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.शिकवण्या करिता प्राचार्य अड्डळटी सर, होवाळे सर, होनुटगी मॅडम,हिरेमठ मॅडम, मोटे मॅडम यांनी नियोजन केले. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापराबद्दल पालक वर्गातून बिळूर इंग्लिश गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेजचे कौतुक होत आहे.
लॉकडाऊन नंतर शासकीय शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार इयत्ता 11 वी व 12 वीचे सर्व शाखा ( आर्ट्स, कॉमर्स व सायन्स ) या विभागाचे वर्ग नियमित पणे सुरु होतील.तसेच इग्रजी माध्यमाचे इयत्ता 1 ली ते 10 वी चे वर्ग सुद्धा नियमित चालू होणार आहेत.असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.