दरीबडची | 3 दिवस लॉकडाऊन | पुर्व भागातील गावात खबरदारी ;

0

कोरोना विरोधात ग्रामपंचायती सतर्क

 

संख,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  दरीबडची ता.जत येथील ग्रामस्थांनी तीन दिवस गाव पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.या बंदच्या काळात दवाखाना,मेडिकल व दूध संकलन वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.मंगळवारी 100 टक्के प्रतिसाद दिला.खबरदारी उपाय म्हणून दरीबडचीला येणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.मंगळवारी ते गुरुवारपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.याशिवाय विनाकारण फिरणाऱ्यांवर दंड आकारण्यात येणार आहे.गावातील प्रत्येका घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.तालुक्याच्या उत्तर भागाला लागून असलेल्या घेरडी (ता सांगोला) येथे एक कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाजवळ कर्नाटकची सीमा आहे.विजापूर येथे कोरोनाचे 41 रुग्ण आहेत.गावातील व परिसरातील लोकांचे व्यवहार विजापूर येथे आहेत. कर्नाटकात, विजापूर व शेजारी खेड्यापाड्यात अनेक नातलग असल्याने येथील नागरिकांचा संबंध येतो.

Rate Card

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी म्हणून लॉकडॉऊन करून गाव बंद करण्यात आले.माजी पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाधर मोरडी,उपसरपंच रमेश मासाळ,ग्रामपंचायत सदस्य आमोगसिध्द शेंडगे,तात्या चव्हाण, तलाठी विलास चव्हाण हे यावर लक्ष ठेवत आहेेेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.