तुकाराम बाबा यांच्याकडून डफळापूरमध्ये भाजीपाल्याचे वाटप
डफळापूर, वार्ताहर : हभप तुकाराम महाराज यांच्याकडून डफळापूर येथील वार्ड नं. 1 मधील सुमारे 150 कुंटुबियांना भाजीपाल़्याचे वाटप करण्यात आले.
श्रीसंत बागडेबाबा चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या पध्दतीने मास्क, धान्य,जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला,वाटप करण्यात येत आहे.अडचणीच्या काळात नागरिकांना साह्य करत श्रींसत तुकाराम महाराज यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.तालुकाभर अशी मदत पोहचवली जात आहे. शुक्रवारी डफळापूरातील सुमारे 150 कुंटुबियांना भाजीपाला किटचे वाटप तुकाराम महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे,सुरेंद्र सरनाईक सर,राजू माळी,कॉ.हणमंत कोळी,किरण कोळी,अतुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
डफळापूर ता.जत येथे हभप तुकाराम महाराज भाजीपाल्याचे वाटप करताना