विश्वगुरू बसवेश्वर जयंती घरोघरी साजरी करा : प्रा.काराजनगी
जत,प्रतिनिधी : समता मानव विश्वगुरू जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती 26 एप्रिल रोजी साजरी होत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बसवेश्वर जयंती घरोघरी साजरी करावी,असे आवाहन बसवदलाचे अध्यक्ष शरण एम.जि.काराजनगी यांनी केले आहे.
देशभर असलेले कोरोना संकट,सोशल डिस्टन्सिंग यामुळे कोठेही गर्दी न करता,बसव अनुयायानी बसव जयंती घरोघरीच साजरी करून शासनाच्या आदेशाचे पालन करावे.जंयतीनिमित्त कोरोना लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या आपल्या परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे मदत करून बसव दासोह तत्व पालन करावे,असेही आवाहन काराजनगी यांनी केले आहे.
