युवा नेते आर.एस.पाटील यांच्याकडून भाजीपाल्याचे वाटप

जत तालुक्यातील बसरगी येथील आर.एस.पाटील यांच्याकडून भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत म्हणून पाटील यांनी हा उपक्रम राबविला.सुमारे 150 पेक्षा जास्त कुंटुबियांना भाजीपाल्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी पिरगोंड पट्टेद, यल्लप्पा कांबळे, शिरुपती बसरगी,राजू मसरगुप्पी,लक्ष्मण कांबळे,प्रशांत करणे, शिवानंद साळे,कार्यकर्ते उपस्थित होते.
बसरगी येथील युवा नेते आर.एस.पाटील यांच्याकडून भाजीपाल्याचे वाटप केले.