जिरग्याळ नजिक बेकायदा दारू वाहतूकीवर छापा | एक लाख वीस हाजाराचा मुद्देमाल जप्त
जत,प्रतिनिधी : जिरग्याळ ता.जत येथे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या वाहन मुद्देमालासह जत पोलीसांनी पकडले.यात 1 लाख वीस हाजाराच्या दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या.आज ता.20 ला सकाळी जिरग्याळ-शेळकेवाडी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी विकास गुंडप्पा सनदी रा.बेंळकी ता.मिरज,शिवराम लोंढे रा.जाडरबोबलाद यांना ताब्यात घेतलेे आहे.
याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी,कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद असतानाही जत पश्चिम भागात बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती जत पोलीसांना मिळाली होती.त्याआधारे पोलीसांनी सापळा लावला होता.विकास सनदी व शिवराज लोंढे हे सिल्वर कलरच्या मारूती स्विट(गाडी नं एमएच 02,एपी- 8808) गाडीतून दारू नेहत असताना जिरग्याळ-शेळकेवाडी नजिक ही गाडी पथकाने पकडली.त्यात टँगो कंपनीचे 13 बॉक्स, प्रत्येक 48 बॉटलप्रमाणे 104 बॉटल जप्त करण्यात आल्या.यांची प्रती बॉटल 52 प्रिंट किंमतीनुसार एकूण 32,448 रूपये व एक चार चाकी वाहन असा 1 लाख 20 हाजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पो.कॉ.महेश मुळीक यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सा.पोलीस निरिक्षक मोहिते करत आहेत.