जत शहर बुधवारपासून चार दिवस लॉकडाऊन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी

0

जत,प्रतिनिधी : जत लगतच्या सांगली,सोलापूर,विजापूर,बेळगाव जिल्हात करोनाचा संसर्ग थांबावा म्हणून जतमध्ये बुधवार 22 ते शनिवार 25 तारखेपर्यत पुर्ण जत शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर,मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी केले.

Rate Card

बन्नेनवर व हराळे म्हणाले,जत शहराच्या बाजूला असणाऱ्या सांगली,सोलापूर कर्नाटकातील विजापूर,बेंळगाव येथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.त्या पार्श्वभूमीवर जत शहरात दक्षता म्हणून चार दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.मंगळवारी विंडो परेड ठेवण्यात आला आहे,त्यादिवशी नागरिकांनी महत्वाच्या वस्तूची खरेदी करावी,बुधवारपासून शनिवार पर्यत मात्र कोणीही घराबाहेर पडू नये

दवाखाने,मेडिकल,बँका चालू राहणार आहेत.मात्र यासाठी शहरातील प्रभाग निहान नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समित्या समितीकडून त्या उपलब्ध केल्या जाणार आहेत.त्यामुळे आपल्या प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधावा,ते आपल्याला नगरपरिषदेशी संपर्क करून मदत करतील.नागरिकाही हा बंद यशस्वी करावे,असे आवाहन बनेन्नवर व हराळे यांनी केले.

संयुक्त बैठकीत घोषणाजत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शहराच्या बाजूच्या जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा प्रभाव व जत शहरातील त्या भागाशी असलेला संपर्क या गोष्टीवर चर्चा झाली.खबरदारी म्हणून जत शहर बुधवारपासून100 टक्के लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री. येरेकर प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील, मुख्याधिकारी अभिजित हराळे, तालुका वैधकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.