कोरोना | संख परिसरात बाहेरून आलेल्या 3,028 जणांची तपासणी पुर्ण | आरोग्य यंत्रणा दक्ष |

0

संख,वार्ताहर : संख प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना विषाणु प्रभाव रोकण्यासाठी सज्ज झाले असून,सीमावर्ती पुर्व भागातील या प्रा.आ.केंद्राच्या परिसरात बाहेरून आलेल्या सुमारे 3,028 लोंकाची तपासणी करून त्यांना निगराणी ठेवले आहे. 

तालूका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कोरोना बाबत सर्व उपाय योजना करण्यात येत आहेत.

याबाबत बोलताना डॉ.सुशांत बुरकुले म्हणाले,परिसरात एकूण 3028 रूग्णाची तपासणी करण्यात आली आहे.त्यात जिल्हा बाहेरून -1288,इतर राज्यहून -80,विदेश मधून आलेले – 03 तसेच 17 गावामध्ये 788 आलेले ऊसतोड मजूर आहेत.1 एप्रिल नंतर जिल्हा बाहेरून आलेले 164 रूग्ण पैकी 132 लोकांना होम कॉरनटाईन ठेवलेले आहे, त्यापैंकी 32 जणांचे होम कॉरनटाईन चालू आहे.

Rate Card

संख आरोग्य केंद्राची तयारीचा आढावा : पहा व्हिडिओ बातमीतून

संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मध्ये 6 उपकेंद्र आहेत.संख,खंडनाळ,अंकलगी,गोंधळेवाडी,दरीबडची,लमाणताडा,सिध्दनाथ,तिल्याळ,आसंगी तुर्क,धुळकरवाडी, मोटेवाडी,पाडोंझरी,पांढरेवाडी, जालिहाळ खुर्द,मुचंडी,दरीकोणूर, आसंगी(जत),या गावात संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.बाहेरून आलेल्या रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा वर्कर,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,सीएचओ पुर्णत:जबाबदारांनी सेवा बजावत आहेत.केंद्रात कोरोना कक्षही स्थापन करण्यात आला आहे.आम्ही कोरोनाच्या लढाईत सर्वत्तोपरी योगदान देऊन भविष्यात कोरोना रोकण्यासाठी दक्ष असल्याचेही डॉ.सुशात बुरकुले यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.