बागलवाडीत 14 ब्रास वाळू साठा जप्त

0
2

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील बागलवाडी नजिकच्या कोरडा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू तस्करी अड्ड्यावर जतचे तहसीलदार सचिन पाटील यांच्या पथकाने छापा टाकला.त्यात नदीपात्रा 10 व लगतच्या शेतात 4 असा 14 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. मात्र पथक येण्याची माहिती मिळाल्याने तस्करांनी वाहने पळवून नेहली.घटनास्थळाचा पंचनामा करून वाळू ताब्यात घेण्यात आली आहे.सुमारे 80 हजार रूपये किंमतीचा हा वाळू साठा आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. बागलवाडी ओढापात्रातून वाळू काढून लगतचे शेतकरी विठ्ठल मारूती शिंदे,सुखदेव मारूती शिंदे,जगन्नाथ मारूती शिंदे यांच्या गट नंबर 92 मध्ये साठा करण्यात येत होता.त्यासाठी या शेतकऱ्यांच्या शेतातून स्वतंत्र वाट करण्यात आल्याचेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले.रितसर कारणे दाखवा नोटीसा पाठविण्यात येणार आहे.तहसीलदार पाटील,मंडल अधिकारी भारत काळे,नंदकुमार भुकटे,तलाठी निखिल पाटील,वालकोळी,सागर भोसले,कोतवाल प्रविण काळे यांच्या पथकाने कारवाई केली.

 बागलवाडी ता.जत येथील कोरडा नदीपात्रात पकडलेली वाळू

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here