डफळापूर पेयजल योजनेचे काम सुरू करा : ढोणे,कोळी

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत.येथील पेयजल पाणी योजनेचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा नेते विक्रम ढोणे, कॉ.हणमंत कोळी यांनी दिला आहे.
ढोणे व कोळी,अतुल शिंदे यांनी नुकतीच पाणी योजनाच्या कामाची पाहणी केली.डफळापूर गावाला पाणी पुरवठा करणारी तालुक्यातील सर्वात मोठी योजना निक्रिय प्रशासन व समितीच्या पदाधिकाऱ्यांच्यामुळे बंद पडली आहे.सुमारे चार कोटी रूपयापर्यतचा निधी मिळूनही पाण्याचा पत्ता नाही.टाकी,शुध्दीकरण यंत्रणा,वितरण पाईपलाईन अर्थवट काम करून सोडून देण्यात आली आहेत.ठेकेदारांच्या कारभार संशयास्पद आहे.पंधरा वर्षापुर्वी योजना सुरू होऊनही कामे होत नसतीलतर हा कोणता प्रकार म्हणायचा.योजनेच्या आतापर्यत झालेल्या कामाची माहिती घेत आहोत.तातडीने रखडलेली कामे करावीत म्हणून प्रशासनाला कळविले आहे.लोकांना भविष्यातील पाणी टंचाई जाणविण्या अगोदर या योजनेचे काम होणे गरजेचे आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करूच त्याशिवाय योजना बंद पाडण्यासाठी काम करणाऱ्या झारीतील शुक्रचार्यांना शोधून त्यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करू असा इशारा ढोणे व कोळी यांनी दिला आहे.
डफळापूर ता.जत येथील पेयजल योजनेच्या कामाची पाहणी करताना युवा नेते विक्रम ढोणे, कॉ.हणमंत कोळी,अतुल शिंदे