जत,प्रतिनिधी : बंदी असलेला गुटख्याची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी दोघावर जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला.दोघाकडून 53 हजार रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे निरिक्षिक सतिश हाक्के यांनी फिर्याद दिली आहे.पोलीसांनी दिलेली माहिती अशी,संशयित विनायक सिध्दाप्पा लोणी,(रा.वाचनालय चौक,कन्याशाळेजवळ जत) हा येळदरी -जत मार्गावर शासनाने बंदी घातलेल्या स्टार,विमल,आर एम डी,सुपर गुटख्याची वाहतूक करताना जत पोलीसांनी छापा टाकला.त्यात 50 हजार 340 रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला.ही कारवाई 27 जानेवारीला दुपारी 12 च्या सुमारास केली.अरूण महादेव चव्हाण (रा.आर.आर.कॉलेजजवळ,जत) हा अरूण पान शॉप या दुकानात बंदी असललेला गुटखा विकत असताना जत पोलीसांनी पकडले.त्याच्याकडे 2 हजार 590 रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सा.पोलिस निरिक्षक मोहिते अधिक तपास करत आहेत.