वळसंग-जत रस्त्याची चाळण,अपघाताचे प्रमाण वाढले | वर्षानुवर्षे दुर्लक्ष : पॅचवर्क,डागडुजी ऐवजी संपुर्ण रस्ताच करावा
वळसंग,वार्ताहर: वळसंग पासून जत पर्यंत असणाऱ्या 11 किमीचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे.सतत पडणाऱ्या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात घडत आहेत.त्यामुळे संपूर्ण रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जत-चडचण असा आंतरराज्यीय प्रमुख महामार्ग आहे.सध्या व्हसपेठ पासून पुढचे डांबरीकरण झाले आहे.तर व्हसपेठ,कोळीगिरी,वळसंग ते जत या मार्गाचे काम झाले नाही.सातत्याने पँचवर्क करण्यात येतात.मात्र हा परिसर काळी जमिन असलेला डोन म्हणून परिचित आहे.दरवर्षी पावसाळ्यात येथील जमीनचा खचली जाते त्यामुळे या रस्त्यावर खड्डे कायम पडत आहेत.सध्याही प्रचंड खड्डे पडल्याने वाहन धारकांनी तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्याशिवाय या मार्गावर असणारे वळसंग पासून 1 किमीवरील धोकादायक एल वळणाने अनेकांचा जीव घेतला आहे.ते काढण्याचीही मागणी आहे.प्रसिद्ध गुड्डापूर धानम्मादेवी मंदिर,जतचा शेवटचा भाग कर्नाटकातील चडचणला जोडणाऱ्या या रस्त्याचे तातडीने चांगला भराव घालून नव्याने काम करावे अशी मागणी होत आहे.
