2020 सालात निवडणूकांचे धुमशान | जिल्हा बँक,मार्केट कमिटी, ग्रामपंचायतीच्या वर्षभर रणधुमाळी

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्याला 2020 हे वर्ष निवडणूकाचे वर्ष ठरणार आहे.तालुक्यातील महत्वाच्या उमदी जि.प.पोट निवडणूकीपासून सुरू होणारा हा निवडणूक हंगाम जिल्हा बँक,सुमारे 40 ग्रामपंचायती,तेवढ्याच सोसायट्या,मार्केट कमिटी इथपर्यत पोहचणार आहे.त्यामुळे वर्षभर तालुका निवडणूकीच्या वातावरणामुळे ढवळून निघणार आहे.यामुळे राजकीय गोटात अंतर्गत आतापासूनच जोरदार हालचाली गतिमान झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभाचे निवडणूकाचा धुरळा खाली बसला आहे.त्यामुळे आता सर्व राजकीय वातावरण शांत झाले आहे.मात्र ही राजकीय शांतत फार काळ टिकणारी नारी.कारण सुरू झालेले 2020 हे वर्ष राजकीय मैदानातही 2020 ते धुमशान करणार आहे.2020 या वर्षात उमदी जिल्हा परिषद पोट निवडणूक, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक, तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणूका,पनासहून अधिक सोसायट्याच्या निवडणूका त्याचबरोबर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत.त्यामुळे वर्षभर राजकीय नेते व कार्यकर्त्याचे वेळापत्रक बिजी असणार आहे.

Rate Card

फेंब्रुवारी मध्ये आमदार विक्रम सांवत हे  विधानसभेवर गेल्याने रिक्त झालेल्या उमदी जिल्हा परिषद मतदार संघाची पोट निवडणूक होणार आहे.त्यामुळे तेथे निवडणूकीचे वातावरण गरम होऊ लागले आहे. त्यानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेची असणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मार्च-एप्रिल दरम्यान होणार आहे. बँकचे संचालक म्हणून जाण्यास विद्यमान आमदार व माजी आमदारामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर एप्रिल -मेच्या दरम्यान तालुक्यातील 40 ग्रामपंचायती व पन्नासवर सोसायट्याच्या निवडणूका होत आहेत.त्यामुळे गावगाड्याचे वातावरण ढवळून निघणार आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा शांत होताच,महत्वाच्या असणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑगष्ट-सप्टेंबर दरम्यान निवडणूका होणार आहेत.यावेळी शेतकरी मतदार होणार असल्याने या निवडणूकीची मोठी चुरस पाह्याला मिळणार आहे.

जत तालुक्यात पुन्हा विद्यमान आमदार विक्रमसिंह सांवत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटातच लढती निश्चित आहेत.गत विधानसभा निवडणूकीत आ.सांवत वरचढ ठरले आहेत.तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत माजी आमदार विलासराव जगताप यांनी बाजी मारत “अभी भी मै मैदानमे हूं” ! चा इशारा दिला आहे.त्यामुळे येत्या निवडणूकात कुणाचे बळ वाढणार याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे.त्याचबरोबर विधानसभा निवडणूकीत स्थापन झालेल्या तिसरी आघाडी काय भूमिका घेणार यावरही मोठी गणिते अवलंबून आहेत.त्यात राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,प्रकाश जमदाडे,डॉ.रविंद्र आरळी,मन्सूर खतीब यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.एंकदरीत 2020 वर्ष हे तालुक्यात राजकारणा साठीही 2020 सामन्याप्रमाणे रंगतदार ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.