म्हैसाळ योजना पुर्ण करा ; मन्सूर खतीब यांची जलसंपदा मंञ्याकडे मागणी

जत,प्रतिनिधी : दुष्काळी जत तालुक्याला संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे काम डिसेंबर 2019 अखेर पूर्ण व्हायलाच हवे होते. परंतु तसे घडलेले नाही. जतची रखडलेली म्हैसाळ योजना तातडीने पूर्ण करावी,अशी मागणी जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री, तथा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मन्सूर खतीब यांनी त्यांची भेट घेत सत्कार केला. यावेळी उपसंरपच शंकर गायकवाड,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सज्जन चव्हाण, बी.आर. पाटील,नंदू चौगुले आदी उपस्थित होते. मन्सूर खतीब यांनी म्हैसाळच्या रखडलेल्या कामाबाबतची माहिती दिली. जलसंपदा खाते आपल्याकडे असून ते कामे मार्गी लावावीत व दुष्काळी जतला दुष्काळमुक्त करावे,अशी मागणी केली.
जिल्हा दौऱ्यावर आलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार करताना मन्सूर खतीब व पदाधिकारी