बेंळूखीत एकाचा विजेच्या धक्याने मुत्यू

डफळापूर,वार्ताहर : बेंळूखी ता.जत येथील संतोष तुकाराम गिड्डे (वय 36)यांना विजेचा शॉक लागल्याने मुत्यू झाला.या घटनेची जत पोलीसात नोंद झाली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,संतोष गिड्डे हे बेंळूखी ग्रामपंचायतीचे शिपाई म्हणून काम करतात.गुरूवारी सकाळी साडे आठच्या सुमारास गिड्डे घरासमोरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता पेटीत त्यांना शॉक लागला.गिड्डे यांना कुटुंबियांनी तात्काळ विजेच्या तारेपासून बाजूला काढत उपचारासाठी कवटेमहांळ येथे नेहत असताना वाटेत त्यांचा मुत्यू झाला. कवटेमहांळ पोलीसांनी झिरो नंबरने गुन्हा दाखल करून जत पोलीसांना वर्ग करण्यात आला आहे. सर्वांशी मनमिळावू असणाऱ्या गिड्डे यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गिड्डे यांच्या वडिलाचेही निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई एकट्याच आहेत.