राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याबद्दल एस एम देशमुख यांचा सोमवारी सांगलीत सत्कार

0
Rate Card

सांगली : भारतात सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आल्याबद्दल या कायद्याचे शिल्पकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांचा सोमवार दि.13 जानेवारी रोजी सांगलीत सत्कार करण्यात येणार आहे.हा कायदा अस्तित्वात यावा म्हणून सांगलीतील पत्रकारांनी देखील मोठे आंदोलन उभे केले होते, तसेच निर्धार मेलावही घेतला होता. त्यामुळे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने यानिमित्ताने अभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता हा मेळावा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लोकमतचे संपादक वसंत भोसले हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप (तात्या) पाटील प्रमुख उपस्थित असणार आहेत. 

या मेळाव्यात श्री. देशमुख आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढलेले मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष किरण नाईक यांनाही गौरविण्यात येणार आहे. मेळाव्यात पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदी, त्याची अंमलबजावणी आणि पत्रसृष्टी समोरील आव्हाने याचा मान्यवर उहापोह करतील. जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच या कायद्यासाठी लढताना पत्रकारांना साथ दिलेल्या व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.