जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली असून महिना दीड महिन्यात तयार झालेल्या वाहक असलेला तरुण चक्क काही दिवसातच चालक म्हणून भरधाव वेगाने वाहन हाकताना दिसत आहे.जत तालुक्यातील अवैध व्यवसायासह,प्रवासी वाहतूक होत असल्याचे कायम अधोरेखित झाली आहे. वाहन वाहतुकीमध्ये अनेक अप्रशिक्षित चालक असून यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.पोलीस मात्र केवळ कारवाईचा देखावा करीत असून अप्रशिक्षित वाहन चालकांवर ठोस कारवाई मात्र होत नाही.तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून जतची ओळख आहे.त्यामुळे ग्रामीण भागातून येथे येणार्यांची संख्याही मोठी असते. तालुक्यातील डफळापूर,संख,उमदी,शेगाव, येळवी,बिळूंर,उमराणीकर अदि गावात त्याच्या जवळपासच्या गावातून वाहतूक होत आहे.तेथेतर चालकाचा परवाना वय याचा विचारच न केलेला बरा अशी स्थिती आहे. एसटी बस अपुरी पडत असल्याने नागरिक खासगी वाहनांचाच आधार घेतात. त्यामुळे तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे.शेकडो वाहनातून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यात ऑटोरिक्षा, जीप, मिनीडोअर, काळी पिवळी या वाहनांचा समावेश आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी तर नित्याचीच बाब झाली आहे. त्यासोबतच टपावर प्रवासी वाहतूक सुरू आहे. या सर्व प्रकारातील धोकादायक बाब म्हणजे अप्रशिक्षित वाहन चालक होय. काही दिवस वाहनांवर वाहक म्हणून काम करणारे तरुण चक्क स्टेअरिंगचा ताबा मिळवितात.भरधाव वाहने चालवितात.कोणात्याही नियमाची परिपुर्ण माहिती किंवा कोणताही परवाना नसताना ही मंडळी बिनधास्तपणे चालक म्हणून वावरताना दिसतात. वाहनात बसायलाही जागा नसते.चालकही छोट्याशा जागेत बसून वाहन चालवितो. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीसोबत अवजड वाहतूकही डोके दुखी ठरत आहे. जत शहरातून बायपास नसल्याने मोठे वाहने थेट शहरातून अगदी मुख्य लोक वस्ती, मुख्य बाजार पेठ, बस स्टँडसमोरून धावताना दिसतात. अवैध प्रवासी वाहतूक आणि अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु पोलीस मात्र नेमून दिलेल्या पॉईंटवर दिसत नाही. त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतुकीमध्ये असलेल्या वाहनांमध्ये रॉकेलचा सर्रास वापर होत आहे.गोरगरिबांच्या हक्काचे रॉकेल वाहनांमध्ये टाकले जात आहे. शहरात धूर सोडणारे अनेक वाहने दिसत आहे.यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागते. सर्वसामान्यही वाहनात रॉकेल आहे की डिझेलवर हे ओळखू शकतो मग पोलिसांना हा प्रकार दिसत नसावा काय? यात सर्व प्रकारात सगळ्यात धोकादायक बाब म्हणजे चालक होण्यासाठी वयही पुर्ण नसणारे चालक आहेत.नियामाचीतर माहिती नसते,आडवे तिडवे कसेही बेफाम वाहने चालवितात कुठेही वाहने उभी करतात. याचा इतर वाहन धारकाना तर त्रास होतोच पंरतु अशा चालविण्याने अपघाताची शक्यता मात्र कायम असते. बरेच अपघात अशा अप्रक्षित चालकाच्यामुळे घडले आहेत.अनेकानी जीवही गमावला आहे,अनेकाना कायमचे अपंगत्व आले आहे.तरीही संबधित विभागाकडून अशा प्रकाराना पायबंध घालण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.बऱ्याच वेळा आरटीओची गाडी जात असताना सुद्धा वाहतूक कोंडी होत असते. अवैध प्रवाशी वाहतूक ही सुरू असते मात्र तेही याकडे कानडोळा करतात त्यामुळे असे प्रकार सतत वाढतच आहेत.
वसूली कलेक्टर बदलला ?जत पोलीस ठाण्याच्या नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांने जुन्या वसुली कलेक्टरची उचलबांगडी करत,आपल्या मर्जीतील नव्या वसूली कलेक्टरची नेमणूक केल्याची चर्चा आहे.आता डब्बल रक्कमेनी जोरात वसूली असल्याचीही चर्चा सुरू आहे.
जत पोलीस ठाण्यासमोरील हे चित्र वास्तव स्पष्ट करते