एंकूडीतील तरूणांचा विहिरीत पडून मुत्यू
जत,प्रतिनिधी : एंकूडी ता.जत येथील 30 वर्षीय तरूणांचा विहिरीत पडून बुडाल्याने मुत्यू झाला.बसवराज सिध्दाप्पा महाजन वय 30,रा.एंकूडी असे मयत तरूणाचे नाव आहे.याबाबत भाऊ आप्पासाहेब सिध्दाप्पा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, बसवराज याला दारूचे व्यसन होते.शनिवार(ता.4) रोजी तो घरातून गेला होता.दरम्यान दारूच्या नशेत तो शेळकेवाडीहून ते जिरग्याळकडे येत होता.नशेत अचानक रस्त्याकडेच्या विहिरीत बसवराज पडला.इकडे शनिवारी संध्याकाळ बसवराज परत आला नाही.म्हणून कुंटुबियांनी शोधाशोध करून जत पोलीसात हरिविल्याची तक्रार दिली होती.दरम्यान सोमवारी सकाळी जिरग्याळ तलावामागील विजय रामू पाटील यांच्या विहिरीत बसवराजचा मृत्तदेह तंरगताना आढळून आला.पोलीसांना काही नागरिकांनी यांची माहिती दिली.पोलीसांनी मृत्तदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.मयत बसवराज यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.