संखमध्ये आर.के.पाटील यांचा सत्कार

0
Rate Card

संख,वार्ताहर : शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पंचायत समितीचे माजी सभापती आर.के.पाटील यांना कर्नाटक राज्यातील “होरनाडू कन्नडिगा” व “कर्नाटक राज्योत्सव” पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरूबसव विद्यामंदिर व ज्यु कॉलेज संख येथे पर्यवेक्षक बी.जी.फुटाणे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व भेट वस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला.शाळेचे सहशिक्षक संतोष पाटील व सचिन बिरादार यांना मनुष्यबंळ विकास लोकसेवा अकादमीच्या गुणवंत शिक्षक गुरूगौरव पुरस्कार मिळाबद्दल आर.के.पाटील यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला.शाळेच्या सर्वोत्तम कामिगिरीमुळे दर्जेदार शैक्षणिक सुविधा व उच्चत्तम शिक्षण पध्दतीमुळे आर.के.पाटील व सहशिक्षक पाटील व बिराजदार यांचा गौरव करण्यात आला.आर.बी.पाटील यांनी आपल्या भाषणात आर.के.पाटील यांनी केलेल्या कष्ठ व निस्वार्थ सेवेबद्दल गौरव झाल्याचे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक सौ.के.के.पाटील,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.डॉ.के.के.आत्तार यांनी सुत्रसंचालन केले.

संख,ता.जत येथील गुरूबसव विद्यालय येथे माजी सभापती आर.के.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.