मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
शारीरीक सुदृढतेसाठी क्रिडा स्पर्धा महत्वाच्या : अक्षय ठिकणे
कवठेमहांकाळ : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे यांच्याहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून स्पर्धांना सुरूवात झाली.त्यावेळी कवठेमहांकाळचे नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सुनील माळी, संस्थापक मोहन माळी,महाराष्ट्र कुस्तीपटू महाराष्ट्र पोलीस मनोज एडके,प्रशांत जाधव,मुबीन वारस्कर,सचिव सौ.नेहा माळी,नंदकुमार माळी,प्राचार्य,आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत गीतानंतर विद्यार्थ्यांनी झुंबा डान्स,नेत्रदीपक असा मार्च,सुंदर असा पिरॅमिड करून दाखवला.कराटे योगा यांची प्रात्यक्षिके,विविध खेळांचे अंतिम चुरशीचे सामने खेळवले गेले.त्यांच्याकडे असलेली जिद्द,चिकाटी दिसून आली.नियोजन क्रीडा प्रशिक्षक गंगाना बिरादार यांनी केले.
पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे म्हणाले, स्पर्धेच्या युगात शिक्षणाला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ लागलेला असून शारीरिक सदृढतेसाठी मैदानी खेळ अत्यंत गरजेचे आहे. राजा नारायणलाल लाहोटी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांची गरज ओळखून सुरु होणार्या क्रिडा स्पर्धा शारीरिक सदृढतेसाठी महत्वाच्या आहेत.

सध्याच्या युगात शिक्षणाला मोठे महत्व प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांना यामुळे अभ्यासाला फार वेळ द्यावे लागत आहे. मात्र अभ्यासाकडे लक्ष देत असताना त्यांच्या शारीरिक सदृढतेवर परिणाम होऊ लागत असल्याचे समोर आल्याचे स्पष्ट आहे. त्यातच स्मार्ट फोन, संगणक यामुळे विद्यार्थी मैदानी खेळात रमत नसल्याचेही खंत व्यक्त करुन विद्यार्थ्यांच्या बौध्दीक क्षमतेच्या वाढीसह शारीरिक सदृढते करिता क्रिडा स्पर्धा अत्यंत महत्वाचे असल्याचे ठिकणे यांनी सांगितले. सुनील माळी,मोहन माळी याांनी
यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंना प्रशस्तीपत्र, पदके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नियोजनअरुण अब्राहम यांनी,सूत्रसंचालन परशुराम कलमडे व लीना वसमाले यांनी केले. आभार मनीषा तिवारी यांनी मानले.
मोहन माळी इंटरनँशनल स्कूलमध्ये क्रिडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करताना सभापती सुनिल माळी,संस्थापक मोहन माळी व मान्यवल