जत,प्रतिनिधी : बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाळूच्या टँक्टरला विरोध केला,म्हणून एकाच्या अंगावर टँक्टर घालण्याचा प्रकार निगडी खुर्द मध्ये घडला.यात मोफतलाल नालसाब शेख (वय 40,रा.निगडी खुर्द) हे जखमी झाले आहे.याप्रकरणी संशयित संतोष संभाजी जाधव व महेश भारत पवार (दोघे.रा.निगडी खुर्द)यांच्या विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी दिलेली माहिती अशी,ता.20/12 रोजी पावेतीनच्या सुमारास तुमच्या शेतातून वाळू चोरून नेहत असल्याच्या मोफतलाल यांना माहिती मिळाली होती.त्यावरून मोफतलाल काराजनगी रोडवरील त्यांच्या शेतात गेले असता संशयितांनी त्यांच्या अंगावर टँक्टर घालून जिवेमारण्याचा प्रयत्न केला,असे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सा.पो.नि.कांबळे करित आहेत.